
ऑपरेशन सिंदूरमुळे हादरलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी आणखी एक बातमी आली आहे. २००६ मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाह पाकिस्तानात मारला गेला. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित अबू सैफुल्लाहची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.