कृष्ण जन्मभूमी वाद! दिल्लीचं तख्त मथुरेतूनच सांभाळणारा मराठ्यांचा महान सरदार माहितीये का?

आयोध्येनंतर आता कृष्ण जन्मभूमीचा वाद देखील पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र या वादाशी मराठे शाहीच्या एका महान सरदाराचे थेट कनेक्शन आहे. ते आपण जाणून घेऊया.
mahadji shinde Maratha Shahi chieftains
mahadji shinde Maratha Shahi chieftains
Updated on

नवी दिल्ली- अलाहाबाद हायकोर्टाने गुरुवारी श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराजवळील शाही इदगाह परिसराचे सर्व्हेक्षण करण्याची परवानगी दिली. त्यानंतर मुस्लिम पक्षकाराने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण, सुप्रीम कोर्टानेही शाही ईदगाह मशिदीचे सर्व्हेक्षण करण्यास स्थगिती देण्यात नकार दिला. या निमित्ताने आयोध्येनंतर आता कृष्ण जन्मभूमीचा वाद देखील पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र या वादाशी मराठे शाहीच्या एका महान सरदाराचे थेट कनेक्शन आहे. ते आपण जाणून घेऊया.

असा दावा केला जातो की औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेले प्राचीन केशवनाथ मंदिर नष्ट केले आणि त्याच ठिकाणी 1669-70 मध्ये शाही ईदगाह मशीद बांधली. यानंतर 1770 मध्ये गोवर्धन येथे झालेल्या युद्धात मराठ्यांचा विजय झाला. या विजयानंतर मराठ्यांनी पुन्हा मंदिर बांधले. या विजयाचे शिल्पकार होते महादजी शिंदे.

उत्तरेत मराठेशाहीचा भगवा झेंडा फडकवणाऱ्या महादजी यांनी दिल्लीचे तख्त मथुरेत बसूनच अनेक वर्षे सांभाळले. त्यांनी मथुरेत अनेक हिंदू मंदिरे उभारली. ते स्वतः कृष्णभक्त होते. त्यांची कृष्णभक्तीवरील कवने देखील उपलब्ध आहेत.

mahadji shinde Maratha Shahi chieftains
श्रीकृष्ण जन्मभूमी वाद! काशीनंतर आता मथुरेतील शाही इदगाहचे सर्व्हेक्षण करण्यास मंजुरी

महादजी शिंदे कोण होते?

महादजी शिंदे यांचा जन्म ३ डिसेंबर १७३० मध्ये झाला. मराठा साम्राज्यातील एक प्रमुख योद्धा म्हणून त्यांना ओळखलं जातं. कमी वयातच त्यांनी आपलं शौर्य दाखवण्यास सुरुवात केली होती. १७४५ ते १७६१ या मराठ्यांच्या राज्य विस्ताराच्या सुवर्णकाळात त्यांनी ५० लढायांचे नेतृत्व केल्याचं सांगितलं जातं. पानीपतच्या तिसऱ्या लढाईतही महादजी यांचा सहभाग होता.

मल्हारराव होळकर यांच्या मदतीने महादजी शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याशी जोडली. त्यांच्याच काळात जोधपूर, जयपूर या मोठ्या राजपूत संस्थानांनी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केलं. मुघलांच्या सत्तेखालील मथुरा ताब्यात घेतले. त्याठिकाणी अनेक हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केल्याचं सांगितलं जातं. मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झालं.

mahadji shinde Maratha Shahi chieftains
श्रीकृष्ण जन्मभूमी वाद! मुस्लिम पक्षकाराला झटका; शाही ईदगाहच्या सर्व्हेक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

पानीपतच्या तिसऱ्या महायुद्धानंतर प्रमुख सरदारांच्या मृत्यूनंतर शिंदे घराण्याची सूत्रे महादजी यांच्याकडे आली. पानीपतच्या लढाईत महादजी देखील सहभागी होते. यात ते जखमी झाले होते. मराठा-अब्दाली युद्धानंतर मराठा साम्राज्याची अनेक सत्ताकेंद्रे बनली. १७५८ मध्ये शिंदेंनी ग्वाल्हेर येथे स्वतंत्र मराठा संस्थान बनवलं.

आज मथुरेचा कृष्णजन्म भूमी वाद पुन्हा उफाळून आला आहे पण कोणत्याही धार्मिक स्थळाला धक्का न पोहचवता हिंदू अस्मितेचे प्रतीक पुन्हा उभे करणाऱ्या महादजी शिंदेंना मात्र आपण विसरून गेलो आहोत हे नक्की. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com