esakal | पोराच्या उपचारासाठी सोनं, जमीन गहाण ठेवली; मागे राहिल्या आठवणी आणि कर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

औषधासाठी सोनं, जमीन गहाण ठेवली; मागे राहिल्या आठवणी आणि कर्ज

उत्तर प्रदेशातील मथुरेत गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्युसह स्क्रब फायटस आणि लेप्टोस्पायरोसिसने हाहाकार माजवला आहे.

औषधासाठी सोनं, जमीन गहाण ठेवली; मागे राहिल्या आठवणी आणि कर्ज

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखनऊ - उत्तर प्रदेशातील मथुरेत गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्युसह स्क्रब फायटस आणि लेप्टोस्पायरोसिसने हाहाकार माजवला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये यामुळे गावात ११ जणांचा मृत्यू झाला असून यात १० मुलांचा समावेश आहे. लोकांनी त्यांना मिळणाऱ्या सरकारी आरोग्य सुविधेवर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे खासगी रुग्णालयात उपचारासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. इतकंच काय तर उपचारासाठी दागिने विकण्याची आणि जमीन गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.

कोहा गावातील हरिशंकर यांच्या कुटुंबातील १५ जण याच्या विळख्यात सापडले होते. त्यांच्या ८ वर्षांच्या मुलाचा यात मृत्यू झाला. त्यानंतर १३ महिन्याच्या मुलीला त्यांनी चांगले उपचार मिळावेत यासाठी खासगी रुग्णालयात उपचार केले. ती आता बरी होऊन घरी आली. पण सरकारी रुग्णालयात उपचार नीट मिळत नसल्यानं खासगी रुग्णालयात उपचारासाठी मोठा खर्च झाला. त्यासाठी घर गहाण ठेवावं लागलं. आता ते कर्ज कसं फेडायचं याची चिंता हरिशंकरला आहे.

मथुरेतील सौरभ चौहान हा २७ ऑगस्टला आजारी पडला होता. त्याच्या आईने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं होतं. तिथं होणारा खर्च पेलवणारा नसल्यानं आग्र्यातील खासगी रुग्णालयात नेलं. एका बाजुला मुलगा रुग्णालयात तर पती घरी आजारी. अशा परिस्थितीत गुड्डी देवी यांनी दागिने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नातेवाईकांकडून ५० हजार रुपये घेतले. इतकं करुनही सौरभला वाचवता आलं नाही. आता मनात त्याच्या आठवणी आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर कसा फेडायचा याची चिंता गुड्डी देवी यांना आहे.

हेही वाचा: हरियाणा : 3 आठवड्यांत 7 मुलांचा मृत्यू; गावात भितीचे वातावरण

कोहामध्ये अनेकांनी या व्हायरल तापाची धास्ती घेतली आहे. गावातील लहान मुलं आणि महिलांना दुसऱीकडे नातेवाईकांकडे पाठवलं आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक व्हिडिओसुद्धा समोर आला होता. त्यात एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी एक बाप डॉक्टरांच्या पाया पडत असल्याचं दिसत होतं. प्रशासनाने यानंतर एक समिती स्थापन करून गावांमध्ये शिबिर सुरु केले. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सरकारी रुग्णालयात कोणाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजुला ज्यांच्या मुलांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या नातेवाईकांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

loading image
go to top