PFI बंदींचे मुस्लीम धर्मगुरुंकडून स्वागत; मौलाना राव मुशर्रफ अली म्हणाले, सरकारने... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi news in Marathi

PFI बंदींचे मुस्लीम धर्मगुरुंकडून स्वागत; मौलाना राव मुशर्रफ अली म्हणाले, सरकारने...

नवी दिल्ली : Muslim Dharam Guru on PFI Ban PFI केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बुधवारी (28 सप्टेंबर) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI सह 8 संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. या निर्णयानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. भारतातील एक घटक हा निर्णय योग्य सांगत असतानाच काही राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते हा निर्णय चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काही मुस्लीम धर्मगुरूंनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

हेही वाचा: Sonia Gandhi: गेहलोत यांच्यावरचा सोनियांचा विश्वास उडाला; काँग्रेस नेत्याचं विधान

मुस्लिम धर्मगुरूंच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारचा हा निर्णय देशहिताच्या दृष्टीने अतिशय चांगला असून हा निर्णय घेणे अत्यंत गरजेचे झाले होते. केंद्र सरकारने ही बंदी आधीच लादायला हवी होती, असंही मुस्लिम धर्मगुरूंचे म्हणणे आहे.

ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आणि भाजपचे आभार मानले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कट्टरपंथी संघटना पीएफआयवर बंदी घालून चांगले पाऊल उचलले आहे. भारताच्या भूमीवर दहशतवाद कधीही फोफावू शकत नाही, असही ते म्हणाले. भारत सुफींची भूमी असल्याने सुफी विचारसरणीचे लोक राहतात, त्यामुळे अशी विचारधारा इथे फोफावू शकत नाही. संपूर्ण भारतात वाहिद बरेलवी उलेमा आहेत ज्यांनी हुकुमत-ए-हिंद या कट्टरतावादी वैचारिक संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. जी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पूर्ण केल्याचंही रिझवी यांनी नमूद केलं.

हेही वाचा: Akhilesh Yadav : अखिलेश तिसऱ्यांदा बनले सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष

मौलाना सैफ अब्बास नक्वी यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून देशविरोधी कारवायांमध्ये जो कोणी सहभागी असेल किंवा देश तोडण्याच्या गप्पा मारणाऱ्या विदेशी संघटनांना पाठिंबा देत असेल, अशा सर्वांवर बंदी घातली पाहिजे. देशातील वातावरण ज्या प्रकारे बिघडवले जात आहे, त्यावर देशाच्या केंद्रीय यंत्रणांनी बारीक लक्ष ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

मुस्लीम राष्ट्रीय मंचचे जिल्हा निमंत्रक राव मुश्रीफ यांनीही केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून पीएफआयवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल आम्ही सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो. पीएफआय सारख्या संघटनांवर केवळ बंदी घालू नये, तर या संघटना भारतातून संपवल्या पाहिजेत.

टॅग्स :Narendra Modimuslim