Sonia Gandhi: गेहलोत यांच्यावरचा सोनियांचा विश्वास उडाला; काँग्रेस नेत्याचं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi And Ashok Gehlot

Sonia Gandhi: गेहलोत यांच्यावरचा सोनियांचा विश्वास उडाला; काँग्रेस नेत्याचं विधान

अहमदाबाद : आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. यादरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या 'राजकारणा'वर वाघेला म्हणाले की, त्यांची दोन्ही पदे धोक्यात असून मॅडमचा (सोनिया गांधी) त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे. (Sonia Gandhi News in Marathi)

हेही वाचा: Akhilesh Yadav : अखिलेश तिसऱ्यांदा बनले सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष

वाघेला म्हणाले, अशोक गेहलोत गांधी परिवारविरोधी भूमिका घेऊ शकतात, असं कोणालाच वाटलं नव्हतं. सीपी जोशी मुख्यमंत्री व्हावेत, अशी गेहलोत यांची इच्छा आहे. मात्र राहुल गांधींनी सचिन पायलट यांना वचन दिलेले आहे. गेहलोत गुजरात निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री राहतील आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, अशी अट घातली होती. मात्र आता त्यांची दोन्ही पदे धोक्यात आली आहेत. त्याच्यावरून मॅडमचा विश्वास उडाला आहे.

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule: तो काळ आता गेला...; सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ विधानावर बावनकुळेंचा टोला!

शंकर सिंह वाघेला पुढे म्हणाले की, अशोक गेहलोत त्यांच्या राज्याचे प्रभारी राहिले तरी ते आता काँग्रेससाठी कुचकामी ठरतील. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर अशोक गेहलोत यांचं अस्तित्व संपुष्टात येईल. तसेच विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवारावर एकमत होणार नाही, हे एक मिथक आहे, त्यालाही इतिहास असेही वाघेला यांनी विरोधकांच्या ऐक्यवर म्हटलं आहे.