'ती' होणार नक्षली भागातून पहिली डॉक्टर

वृत्तसंस्था
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

'माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला पुढील शिक्षण घेणे हे कठिण होते, पण मी मागे नाही हाटले, शिक्षण घेत राहिले. माझ्या वैद्यकीय शिक्षणासाठी फीचे पैसे गोळा करणे हे ही तितकेच अवघड होते, पण माझ्या भावाने, वहिनीने व नातेवाईकांनी पैसे गोळा करून माझी फी भरली. मी डॉक्टर झाल्यानंतर माझ्या भागात येऊन सेवा करू इच्छिते' असे मत तिने व्यक्त केले. 

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील आदिवासी मुलगी माया कश्यप ही वैद्यकीय प्रवेश परिक्षा उत्तीर्ण झाली आहे. सुकमा सारख्या नक्षलवादी भागातून वैद्यकीय परिक्षा उत्तीर्ण होणारी ही पहिलीच मुलगी आहे. कोणतेही कोचिंग क्लास न लावता माया ही परिक्षा उत्तीर्ण झाली आहे. 

'मला आनंद होतोय की, मी ही प्रवेश परिक्षा उत्तीर्ण झाले. माझे लहानपणापासूनचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता पूर्ण होईल,' अशी भावना मायाने व्यक्त केली. नक्षली व आदिवासी भागातून एखादी मुलगी डॉक्टर होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. माया ज्या शाळेत शिकायची त्या शाळेत क्वचितच शिक्षक दिसायचे. काही प्राथमिक शिक्षण मध्येच सोडून द्यायचे, काही कसेतरी दहावी उत्तीर्ण व्हायचे. अशा परिस्थितीत एका मुलीने जिच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले आहे, तिने वैद्यकीय परिक्षा उत्तीर्ण व्हावी, ही आश्चर्याची बाब आहे.

'माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला पुढील शिक्षण घेणे हे कठिण होते, पण मी मागे नाही हाटले, शिक्षण घेत राहिले. माझ्या वैद्यकीय शिक्षणासाठी फीचे पैसे गोळा करणे हे ही तितकेच अवघड होते, पण माझ्या भावाने, वहिनीने व नातेवाईकांनी पैसे गोळा करून माझी फी भरली. मी डॉक्टर झाल्यानंतर माझ्या भागात येऊन सेवा करू इच्छिते' असे मत तिने व्यक्त केले. 

Web Title: maya will be the first doctor from sukama naxalite area