मायावती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ : भाजप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

कोलकाता : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी कसाबवरून केलेल्या प्रतिक्रियेला उत्तर देताना त्या मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

कोलकाता : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी कसाबवरून केलेल्या प्रतिक्रियेला उत्तर देताना त्या मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला "कसाब' ही उपमा दिली होती. त्यावरून मायावती यांनी प्रचारसभेतून उत्तर देत सध्या देशात अमित शहा यांच्यापेक्षा कोणताही मोठा कसाब नसल्याची टीका केली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते राहुल सिन्हा यांनी मायावतींवर निशाणा साधला आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, "मायावती यांची मानसिक स्थिती ठीक नाही. त्या स्वत:ला पराभूत समजत असल्यानेच अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. आता दलित मतांपैकी अनेक मते भाजपला मिळत आहेत. अमित शहा हे अतिशय विनयशील असून ते तळागाळातील कार्यकर्त्यांचे नेते आहेत. मायावती यांनी शहा यांच्यावर टीका करण्यापूर्वी त्यांची राजकीय पार्श्‍वभूमी जाणून घ्यायला हवी होती. मायावती यांनी शहा यांच्याएवढा संघर्ष केलेला नाही.'

Web Title: Mayaawti mentally unstable : BJP