भाजपला पराभूत करण्यासाठी मायावती-अखिलेश येणार एकत्र ?

Mayawati and Akhilesh might be come together to defeat BJP
Mayawati and Akhilesh might be come together to defeat BJP

नवी दिल्ली : मध्यप्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष काँग्रेससोबत आघाडीसाठी वाट पाहणार नाही. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही बहुजन समाज पक्षासोबत आघाडीसाठी चर्चा करणार आहोत, असेही समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज (शनिवार) सांगितले.

''छत्तीसगड आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत आघाडीबाबत काँग्रेसची वाट पाहणार नाही. छत्तीसगड आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी दोंडवनन गणतंत्र पक्षाशी याबाबत चर्चा केली आहे. त्यानंतर आता बसपाशी चर्चा करू. काँग्रेसने खूप वाट पाहायला लावली. कधीपर्यंत वाट पाहायची. आता तारखाही जाहीर होत आहेत. त्यामुळे आता प्रतिक्षा संपली'', असे अखिलेश यादव म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता अखिलेश यादव यांनी काँग्रेससोबत आघाडीबाबत वक्तव्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com