काळ्या पैशाच्या मुद्यांवर नरेंद्र मोदी गप्प का?- मायावती

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

काळे धन आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेद्र मोदी गप्प का आहेत, असा प्रश्न आज बसपा प्रमुख मायावती यांनी उपस्थित केला. त्यांनी काळ्या पैशाच्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी काहीच बोलताना दिसत नाहीत असे म्हटले आहे. त्याचबरोबर, देशातून पलायन केलेल्या लोकांना अटक करण्यातही हे सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

लखनऊ - काळे धन आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेद्र मोदी गप्प का आहेत, असा प्रश्न आज बसपा प्रमुख मायावती यांनी उपस्थित केला. त्यांनी काळ्या पैशाच्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी काहीच बोलताना दिसत नाहीत असे म्हटले आहे. त्याचबरोबर, देशातून पलायन केलेल्या लोकांना अटक करण्यातही हे सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

व्यावसायिकांनी भारतीय बँकाकडून कर्ज घेतले, व ते परत न करताच देशातून त्यांनी पलायन केले. देशातील जनता फक्त वाट बघत बसली आहे की, सरकार काहीतरी कारवाई करेल, परंतु, केंद्र सरकार कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. सरकार असहाय्य झाल्याचे दिसत आहे. कारण ते लोक भारतीय जनता पक्षाच्या जवळचे आहेत, असा आरोप मायावती यांनी केला आहे. याच कारणाने भाजपकडे जास्त पैसा आहे. हा भारतीय जनता पक्ष नसून भारतीय धनी पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय जनतेला काळा पैसा वापस येईल अशी खुप आशा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा वापस आणण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते आतापर्यंत या बाबतीत काहीच करु शकले नाहीत. सरकार प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरत आहे. आपले अपयश लपवण्यासाठी भाजप निंदनीय राजकारण करत आहे आणि याच कारणाने त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचा आरोप यावेळी मायावती यांनी केला.

Web Title: mayawati critcise on narendra modi and central government