राहुल गांधींवर टिका करणाऱ्या नेत्याला पदावरून काढले

Mayawati dismissed bsp leader in his position
Mayawati dismissed bsp leader in his position

लखनऊ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना परदेशी म्हटल्यामुळे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायवती यांनी एका ज्येष्ठ नेत्याला त्याच्या पदावरून काढून टाकले. 

लखनऊ येथे झालेल्या बसपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जय प्रकाश सिंह यांनी राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी परदेशी वंशाच्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत. सध्या देशातील परिस्थिती पाहता मायावतीच पंतप्रधान झाल्या पाहिजेत. असे बेताल वक्तव्य त्यांनी केले होते. याचा चांगलाच समाचार घेत मायावती यांनी त्यांना पदावरून काढून टाकले.

मायावती म्हणाल्या, "लखनऊ येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जय प्रकाश सिंह यांनी पक्षाच्या विचाधारे विरोधी भाषण केले. यात त्यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर व्यक्तीगत टिका केली. हे त्यांचे व्यक्तीगत मत असून पक्षाशी त्याचा कसलाही संबंध नाही."

मायावतींची नेत्यांना तंबी
येणारी लोकसभा निवडणूक आणि कोणत्याही राज्यातील युती संदर्भात कसलेही वक्तव्य न करण्याची तंबीच मायावती यांनी बसपाच्या सर्व नेत्यांना दिली आहे. युती संदर्भातील सर्व निर्णय पक्षाच्या प्रमुखांवर सोडून द्या. तेच याचा निर्णय घेतील असेही मायावती म्हणाल्या.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com