मायावतींनी व्याह्यासह दोघांची पक्षातून केली हकालपट्टी, आधी 4 राज्यांची जबाबदारी काढून घेत केलेली कारवाई

बहुजन समाजवादी पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पुतण्या आकाश आनंदच्या सासऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केलीय. याआधी त्यांच्याकडून चार राज्यांची जबाबदारी काढून घेण्यात आली होती.
Mayawati Expels Akash Anand Father in Law from BSP

Mayawati Expels Akash Anand Father in Law from BSP

Esakal

Updated on

उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय हालचालींना सुरुवात झालीय. बहुजन समाज पार्टीमध्ये फेरबदल केले जात आहेत. पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी थेट व्याह्याची पक्षातून हकालपट्टी केलीय. मायावती यांच्या भावाचा मुलगा आकाश आनंदचे सासरे अशोक सिद्धार्थ यांना पक्षातून काढून टाकण्यात आलंय. त्यासोबत बसपा समन्वयक रणधीर सिंह बेनीवाल यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com