दिल्ली पोलिसांनो.. शिका त्यांच्याकडून काहीतरी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

मुंबई : हैदराबादमधील 26 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिला जाळण्यात आल्याची घटना आठवड्यापूर्वी घडली होती. या घटनेतील चारही आरोपींचा आज पहाटे तीन वाजता हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. त्यांच्या या कृत्यावर आता सर्वस्तरातून कौतुकाची थाप मिळत आहे. तर बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी दिल्ली आणि उत्तरप्रदेश सरकारला दिल्ली पोलिसांकडून काहीतरी शिका असा टोला लगावला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

''उत्तरप्रदेशात महिलांविरुद्ध होणारे अत्याचार वाढले आहेत मात्र, सरकार झोपलं आहे. दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी हैदराबादच्या पोलिसांकडून धडा घ्यायला हवा. सध्या उत्तरप्रदेशात गुन्हेगारांना पाहुण्याप्रमाणे वागणूक दिली जाते,'' अशा शब्दांत त्यांनी दिल्ली आणि उत्तरप्रदेश पोलिसांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

हैदराबादमध्ये 26 वर्षीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिला जाळण्यात आल्याची घृणास्पद घटना आठवड्याभरापूर्वी घडवली होती. या प्रकरणातील चारही आरोपींचा आज हैदराबाद पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. या एन्काऊंटरमधील प्रमुख पोलिस आयुक्त व्हीसी सज्जनार यांचा हा धाडसी निर्णय होता. त्यांच्या या निर्णयामुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे तर त्यांचे आभारही मानले जात आहेत. 

हैदराबाद पोलिसांची भूमिका संशयास्पद : उज्वल निकम

या चारही आरोपींनी ज्या ठिकणी हैदराबाद बलात्कार प्रकरणातील पीडितेवर बलात्कार केला होता त्याठिकाणी त्यांना घटनास्थळाची पुर्नबांधणी करण्यासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हाच प्रयत्न थांबविताना त्यांचा एन्काऊंटर केला गेला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayawati says UP and Delhi cops must learn from Hyderabad Police