मोदींनी देशाला फकीर केले - मायावती

यूएनआय
बुधवार, 7 डिसेंबर 2016

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुकूमशाही पद्धतीने नोटाबंदीचा निर्णय लादला असून, मोदी यांनी संपूर्ण देशाला फकीर केले आहे, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मंगळवारी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला केले.

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुकूमशाही पद्धतीने नोटाबंदीचा निर्णय लादला असून, मोदी यांनी संपूर्ण देशाला फकीर केले आहे, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मंगळवारी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बी. आर. आंबेडकर सामाजिक व परिवर्तन स्थळ येथे आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या,""भाजपच्या कार्यक्रमपत्रिकेवरील काशी विश्‍वनाथ, कृष्ण जन्मभूमी हे विषय, रोहित वेमुला व उना येथील घटनेत घेतलेली दलितविरोधी भूमिका यामुळे या पक्षाचे भवितव्य धोक्‍यात आले आहे.'' डॉ. आंबेडकर यांनी देशातील राज्यघटनेची रचना धर्मनिरपेक्षतेवर आधारित केली आहे. त्यात बदल करून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) राज्यघटना हिंदुत्वावर आधारित करीत आहे, अशी टीका करून त्या म्हणाल्या, दलित व मागासवर्गीयांसाठी दिलेले आरक्षण रद्द करण्याचाही त्यांचा डाव आहे.

आगामी निवडणुकीत समाजवादी पक्ष व अन्य पक्षांकडून कट कारस्थान रचून गोंधळ निर्माण करण्याची शक्‍यता असून त्याबाबत दक्ष राहण्याचा इशारा मायावती यांना मुस्लिमांना दिला. डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, मायावतींनी आपल्या 80 मिनिटांच्या प्रदीर्घ भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, समाजवादी पक्ष, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, कॉंग्रेस पक्ष आदींना लक्ष्य केल्याने कार्यक्रमाला राजकीय स्वरूप आले होते.

त्या म्हणाल्या, 'मोदी कायमच दलितांविरोधात होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कामाच्या पद्धतीवरून हे सिद्ध होते. भाजप व आरएसएस यांना डॉ. आंबेडकर आवडत नाहीत. त्यामुळेच अयोध्यातील बाबरी मशिद त्यांनी 6 डिसेंबर रोजीच पाडली. महान नेत्याचे महापरिनिर्वाणदिन लक्षात न ठेवता त्यांनी केलेल्या चुकीच्या कृत्याची आठवण लोकांनी ठेवावी, हा यामागील हेतू आहे.'' कॉंग्रेसने डॉ. आंबेडकर यांचा कायम तिरस्कार केला. दलितांना सत्ता मिळू नये यासाठी आता भाजपही त्यांचाच कित्ता गिरवित आहे, असे टीकास्त्र त्यांनी या दोन्ही पक्षांवर डागले.

हत्तींनी पुरविला "बबुआ'चा पिच्छा - मायावती
उद्यानांत उभारलेले हत्तीचे पुतळे व स्मारकावरून उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मायावती यांच्यावर उपरोधिक टीका केली. त्याचा समाचार घेताना त्या म्हणाल्या, 'राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्या पक्षाला फुकट प्रसिद्धी मिळविण्यात "बबुआ'ने (छोटा मुलगा) मदतच केली आहे. बसपचे हत्ती गेल्या नऊ वर्षांपासून काहीही हालचाल न करता निश्‍चल आहेत, असे "बबुआ' सातत्याने सांगत आहे. बसपचे निवडणूक चिन्ह त्याला त्रासदायक ठरत असून त्याच्या स्वप्नातही ते पिच्छा सोडत नाही, असे यावरून दिसत आहे.''

Web Title: mayawati talking about narendra modi