महापौरांच्या मोटारीला 'नो नंबरप्लेट'

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

लखनौ (उत्तर प्रदेश): अलाहाबादच्या महापौर अभिलाशा गुप्ता यांच्या मोटारीवर नंबर प्लेटवर क्रमांकाऐवजी 'महापौर इलाहाबाद' असे आहे. संबंधित मोटारीकडे पाहून सर्वसामान्य नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करताना दिसतात.

प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर म्हणाल्या, 'संबंधित मोटार मी खरेदी केलेले नसून, उत्तर प्रदेश सरकारने मला दिलेली आहे. मोटारीवर नंबर प्लेट नसल्याच्या माझ्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाशी संपर्क साधला होता. प्रशासनाने लवकरच नंबर देऊ असे आश्वासन दिले आहे. मोटारीला सध्या नंबर नसला तरी हा विषय लवकरच मार्गी निघेल.'

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी रस्ता सुरक्षिततेसाठी त्या-त्या विभागांना लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, अलाहाबादच्या महापौरांना नंबरप्लेट नसलेली मोटार वापरावी लागत आहे. यावरून सर्वसामान्यांची काय अवस्था असेल, हे लक्षात येते. महापौरांची मोटार रस्त्यावरून जात असताना नागरिक आश्चर्याने त्या मोटारीकडे पहाताना दिसतात.

Web Title: Mayor In UP Seen Travelling In Car Without Number Plate