MMBS: आता एमबीबीएसचं शिक्षण हिंदीतून घेता येणार; 'या' राज्याने सुरू केली सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MBBS study news in Marathi

MMBS: आता एमबीबीएसचं शिक्षण हिंदीतून घेता येणार; 'या' राज्याने सुरू केली सुविधा

भोपाळ : मध्य प्रदेशातील सर्व 13 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऍनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री हे तीन एमबीबीएसचे विषय हिंदीमध्ये शिकवले जाणार आहेत. (MBBS study news in Marathi)

हेही वाचा: परीक्षेत कॉपीच्या संशयावरून शिक्षकाने काढायला लावले कपडे; ९वीच्या मुलीने पेटवून घेतलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 16 ऑक्टोबर रोजी भोपाळमध्ये प्रथम वर्ष एमबीबीएसच्या अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन करून राज्यात वैद्यकीय शिक्षण हिंदीमध्ये सुरू करणार आहेत. या उपक्रमामुळे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम हिंदीतून शिकवता येत नाहीत हा समज बदलेल, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

चौहान म्हणाले, हिंदी माध्यमात शिक्षण घेऊनही जीवनात प्रगती करता येते, हा विचार प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. शिक्षणाचे माध्यम मातृभाषेतूनच असावे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे.

हेही वाचा: Viral Video: दुकानाबाहेरचा बल्ब चोरणारा पोलिस अधिकारी निलंबित, व्हिडीओमुळे कारवाई

गांधी मेडिकल कॉलेज, भोपाळ येथे रीतसर स्थापन केलेल्या 'मंदार' या हिंदी सेलद्वारे या वर्षी फेब्रुवारीमध्ये पुस्तकांच्या हिंदी अनुवादासाठी एक पद्धतशीर अभ्यासक्रम तयार करण्यात आला. या टास्क फोर्समध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. 97 वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि तज्ञांनी 5,568 तासांहून अधिक काळ विचारमंथन करून हा अभ्यासक्रम तयार केला.