
MBBS student loses life after exam pressure case sparks discussion
Esakal
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एका एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यानं गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी घडलेल्या या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. पोलिसांनी सांगितलं की, घटनास्थळी सुसाइड नोट सापडलीय. त्यात माझ्याकडून झालं नाही, मला माफ करा बाबा असं लिहिलंय.