दिल्लीला लंडनप्रमाणे बनवू - केजरीवाल

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या 10-15 वर्षांपासून भाजपचे सरकार असूनही, ते दिल्लीत गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या विकासाएवढा विकास करू शकलेले नाहीत.

नवी दिल्ली - आगामी महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) विजय मिळाला, तर दिल्लीला लंडनप्रमाणे बनवू, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.

केजरीवाल म्हणाले, की मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या 10-15 वर्षांपासून भाजपचे सरकार असूनही, ते दिल्लीत गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या विकासाएवढा विकास करू शकलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीत 'आप'ला 67 जागा मिळाल्या होत्या. आता महापालिका निवडणुकीतही 'आप'ला मोठा विजय अपेक्षित आहे. यामुळे वर्षभरात आम्ही दिल्लीला लंडनप्रमाणे बनवू असे आश्वासन देतो. अनियमित बांधकामे नियमित करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. सध्या हा विषय दिल्ली उच्च न्यायालयात आहे.

केजरीवाल यांच्या या आश्वासनावर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. तर, भाजप नेते किरण रिज्जू यांनी केजरीवाल हे काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे म्हटले आहे.

Web Title: MCD Election 2017: Arvind Kejriwal promises to make Delhi look like London