MCD Exit Poll 2022: दिल्ली महापालिकेत भाजपचा 'धुव्वा', 'आप'ला बहुमत; एक्झिट पोल्स जाहीर

विविध कंपन्यांनी केलेले दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.
 Arvind Kejriwal
Arvind KejriwalSakal

नवी दिल्ली : दिल्लीच्या महापालिका निवडणुकांचे विविध कंपन्यांचे एक्झिट पोल्स जाहीर झाले आहेत. त्यानुसार, यामध्ये दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीलाच महापालिका निवडणुकांमध्येही बहुमत मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे. (MCD Exit Poll 2022 AAP may gets majority in Delhi Municipal Corporation)

इंडिया टुडेचा एक्झिट पोल काय?

आप - १४९-१७१

भाजप - ६९-९१

काँग्रेस - ०३-०७

इतर - ०५-०९

ईटीजी-टीएनएन

आप - १४६-१५६

भाजप - ८४-९४

काँग्रेस - ०६-१०

इतर - ०० -०४

आज तक

आप- १४९ ते १७१

भाजप ६९-९१

टाईम्स नाऊ

आप १४६ ते १५६

भाजप ८४ ते ९४

न्यूज-एक्स - जन की बात

आप - १५९-१७५

भाजप -७०-९२

दिल्लीवर वर्चस्व राखण्यासाठी तिन्ही महापालिकांचं एकत्रिकरण

दिल्ली विधानसभेत वर्चस्व राखण्यासाठी भाजपनं मोठी खेळी करत दिल्लीतील तीन महापालिकांचे ‘विसर्जन' करून २५० वॉर्डांची एकच महापालिका बनविण्याचा घाट घातला होता. हाच प्रकार आता त्यांच्या अंगलट येणार आहे. सन २००७ पासून या महापालिकांमध्ये वर्चस्व राहिलेल्या भाजपनं या १५ वर्षांच्या कार्यकाळात नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली व पूर्व दिल्ली महापालिका परिषद अशा तीन संस्था अस्तित्वात आणल्या. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीलाच तिन्ही महामंडळांचं एकत्रीकरण करण्यात आलं. निवडणुका जाहीर करण्यातही भाजप नेतृत्वानं जो खेळ केला त्याबद्दलही दिल्लीकर नाराज असल्याचं या चाचण्यांमधून दिसतंय.

आपच्या नेत्यांवर कारवाई

दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आदी आप नेत्यांवर कारवाईची तलवार लटकावली होती. जैन हे अजूनही कारागृहात आहेत. दिल्ली भाजपने महापालिकेत आक्रमक प्रचार केला. प्रदूषणाच्या मुद्यावर केजरीवाल व हिटलर यांची छायाचित्रे लावून भाजपने केजरीवाल यांच्यावर व्यक्तिगत आरोपांची राळ उडविली. भाजपचे काही केंद्रीय मंत्री, योगी आदित्यनाथ यांच्यासह सहा मुख्यमंत्री आदींनी दिल्लीत काही सभा घेतल्या. मात्र भाजपच्या राष्ट्रीय सर्वोसर्वा नेतृत्वाने दिल्लीतील रागरंग पाहून येथील प्रचारातून आधीच अंग काढून घेतल्याचे चित्र होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com