बॅंकिंगमधील घोटाळे रोखण्यासाठी कृती आराखड्याची गरज

वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

नवी दिल्ली : देशातील डिजिटल बॅंकिंग घोटाळ्याच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्यांनी कृती आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी गुरूवारी केले.

विधानभवनात येण्यापासून मलाच रोखले; राज्यपालांचा आरोप

शुन्य प्रहरा दरम्यान भाजपचे खासदार अरविंद कुमार शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले, की एकीकडे देश डिजिटल इंडियाकडे जात आहे तर दुसरीकडे अशा प्रकारे होणाऱ्या फसवणूकीच्या घटना वाढल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देश डिजिटल होत असताना डिजिटल बॅंकिंगमध्ये पेटीएम सारख्या वेगवेगळ्या ऍप्सचा फायदा घेत ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. दररोज नवनवीन घोटाळे होत आहेत आणि पोलिस फसवणूकीचा गुन्हादेखील नोंदवत नाहीत असा आरोपही त्यांनी यावेळी केला. यानंतर ओम बिर्ला यांनी यावर कृती आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: measures suggested by Om Birla to stop digital banking scams in India