प्रसारमाध्यमांची भारतात वाढतेय गळचेपी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 
नॉर्वे - 1 
भारत - 136 
पाकिस्तान - 139 
चीन -176 
उत्तर कोरिया - 180 

नवी दिल्ली - माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची स्थिती शेजारी देश पाकिस्तान आणि चीनसारखीच बिकट असल्याचे समोर आले आहे. माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात भारत तीन स्थानांनी घसरून 136 व्या स्थानी आला आहे. 

पॅरिसस्थित "रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स' संस्थेने माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला आहे. यात 180 देशांचा समावेश आहे. सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना ऑनलाइन माध्यमातून लक्ष्य करण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल होत आहेत. याचबरोबर प्रसारमाध्यमांमध्ये स्वत:हून लादलेली सेन्सॉरशिप वाढत आहेत, असे संस्थेने म्हटले आहे. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतरचा "फेक न्यूज' आणि "पोस्ट ट्रूथ'च्या कालखंडात माध्यम स्वातंत्र्याला सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. याआधी कधीही माध्यम स्वातंत्र्याला एवढा मोठा धोका नव्हता. अमेरिका आणि ब्रिटनही माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात दोन स्थानांनी घसरून अनुक्रमे 43 आणि 40 व्या स्थानावर आले आहे. निर्देशांकात ईटली सवाधिक 25 स्थानांनी वाढून 52 व्या स्थानी आला आहे. 

दोन तृतीयांश देशांतील स्थिती घसरली 
माध्यम स्वातंत्र्याची स्थिती चांगली असलेल्या देशांची संख्या या वर्षी दोन टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. एकूण देशांपैकी दोन तृतीयांश देशांतील माध्यम स्वातंत्र्याची स्थिती दिवसेंदिवस घसरत आहे. या यादीत उत्तर कोरियात सर्वांत शेवटी आहे. गेले दशकभर ईरिट्रियाकडे शेवटचे स्थान होते; मात्र उत्तर कोरियाने आता शेवटचे स्थान पटकावले आहे. शेवटच्या पाच देशांमध्ये चीन, सीरिया, तुर्कमेनिस्तान, ईरिट्रिया आणि उत्तर कोरिया हे देश आहेत. 

माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 
नॉर्वे - 1 
भारत - 136 
पाकिस्तान - 139 
चीन -176 
उत्तर कोरिया - 180 

Web Title: media continues to thrive in the media