esakal | "पिगॅसस प्रकरण म्हणजे भारतीय लोकशाहीची निंदा करण्याचा प्रयत्न"
sakal

बोलून बातमी शोधा

IT minister Ashiwini Vaishnav

"पिगॅसस प्रकरण म्हणजे भारतीय लोकशाहीची निंदा करण्याचा प्रयत्न"

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : संवेदनशील विषयांवर काम करणारे पत्रकार, राजकीय मंडळी आणि न्याय व्यवस्थेतील काही लोकांचे फोन टॅपिंग प्रकरण काल समोर आल्यानंतर त्यावर आज (सोमवार) केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिवेशनादरम्यान लोकसभेत भाष्य केलं. माध्यमांनी अधिवेशनापूर्वीच अशा प्रकारे सनसनाटी बातमी देणं म्हणजे भारतीय लोकशाहीची निंदा नालस्ती करण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Media reports day before parliament session attempt to malign Indian democracy Ashwini Vaishnaw aau85)

वैष्णव म्हणाले, "उच्च सनसनाटी बातमी काल रात्री एका वेबपोर्टलनं दिली आहे. या बातमीमध्ये विविध प्रकारचे मोठे आरोप करण्यात आले आहेत. हा रिपोर्ट अधिवेशनाच्या एक दिवस आधी उघड करण्यात आला आहे. हा कुठलाही योगायोग नाही, जाणून बुझून अधिवेशनापूर्वी तो उघड करण्यात आला"

यापूर्वीही पिगॉसस या स्पायवेअरद्वारे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हेरगिरी झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या मीडिया रिपोर्ट्सना कुठल्याही ठोस माहितीचा आधार नाही. सर्वच राजकीय पक्षांनी हे आरोप नाकारले आहेत. १८ जुलै २०२१ रोजी समोर आलेला मीडिया रिपोर्टही अशाच प्रकारे भारतीय लोकशाहीची आणि बड्या संस्थांची निंदा नालस्ती करण्यासाठी करण्यात आला आहे, असा आरोप वैष्णव यांनी केला आहे. त्यामुळं मी सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती करतो की त्यांनी या रिपोर्टमधील आरोपांचा तथ्ये आणि तर्काच्या आधारे अभ्यास करावा.

या अहवालाचा आधार असा आहे की, एक टोळी आहे ज्याला ५०,००० फोन नंबरच्या लीक डेटाबेसचा अॅक्सेस मिळाला आहे. ते पुढे म्हणाले की, अहवालात असे म्हटले आहे की डेटामध्ये फोन नंबर अस्तित्त्वात आल्यामुळे हे स्पष्ट होत नाही की एखादं उपकरण पेगाससने संक्रमित होतं किंवा ते हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे, असंही वैष्णव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जगभरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या नावांची यादी ‘लिक’ झाली असून यामध्ये चाळीस भारतीय पत्रकारांची नावे असल्याचे उघड झाले आहे. हे सर्व पत्रकार संवेदनशील विषयांवर काम करत होते. ‘द वायर’ या वृत्तसंस्थेने १८ जुलै २०२१ रोजी रात्री ही माहिती उघड केली. एका अज्ञात संस्थेने ‘पिगॅसस’ स्पायवेअरचा वापर करून ही हेरगिरी केल्याचेही उघड झाल्याचं वायरनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

loading image