NEET परीक्षा आता 17 जुलैला होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NEET Exam

NEET परीक्षा आता 17 जुलैला होणार

केंद्रीय मनुष्यबळ आणि संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेल्या JEE Main, NEET सोबत सीबीएसई परीक्षांच्या तारखेबददल अधिकृत माहिती समोर आली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET 17 जुलै रोजी होणार असल्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आज केली. (Medical entrance exam NEET will be held on July 17, the National Testing Agency (NTA) announced)

हेही वाचा: OBC आरक्षण कायद्याला आव्हान, आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

NEET परीक्षेची नोंदणी बुधवारीपासून सुरू झाली. JEE Main ही अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी असलेली प्रवेश परीक्षा जून आणि जुलैमध्ये घेतली जाईल, असेही एनटीएने सांगितले.

NEET परिक्षा देशभरातील केंद्रांवर 13 भाषांमध्ये होणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 6 मे आहे. तर विद्यार्थ्यांनी माहिती NTA वेबसाइटवर माहिती जाणून घ्यावी. तसेच सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सूचनांचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट अपात्र ठरवले जाईल," असे NTA अधिकाऱ्याने स्पष्ट सांगितले.

हेही वाचा: चीनी हॅकर्सकडून भारतीय पॉवर ग्रीड लक्ष्य, अहवालातून माहिती उघड

गेल्या वर्षी, NEET-अंडर ग्रॅज्युएट परीक्षा १२ सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती, ज्यामध्ये नोंदणीकृत ९५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी बसले होते.

अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा JEE Mainचे पहिले सत्र जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, तर दुसरे सत्र जुलैमध्ये होणार आहे. पहिले सत्र आता 20-29 जून दरम्यान होणार आहे.

Web Title: Medical Entrance Exam Neet Will Be Held On July 17 The National Testing Agency Nta Announced

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..