

Summary
मेरठमध्ये एका डॉक्टरने अडीच वर्षांच्या मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर टाके न घालता चक्क फेविकॉल लावल्याचा गंभीर आरोप आहे.
योग्य वैद्यकीय तपासणी न करता डॉक्टरांनी पालकांना बाहेरून फेविकॉल आणायला सांगितले.
फेविकॉल लावल्यानंतर मुलाला संपूर्ण रात्रभर तीव्र वेदना सहन कराव्या लागल्या.
उत्तरप्रदेशातील मेरठमधील एका डॉक्टरचा निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अडीच वर्षांच्या मुलाच्या डोळ्याच्या दुखापतीवर अशा पद्धतीने उपचार करण्यात आले की त्याबद्दल ऐकणाऱ्या सर्वांनाच हादराच बसेल. मुलाला जखम झाली होती त्यामुळे टाके घालावे लागणार होते, परंतु डॉक्टरांनी जखमेवर पाच रुपयांचे फेविकॉल लावले असा आरोप आहे. परिणामी, मुलाला रात्रभर वेदना होत राहिल्या आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रुग्णालयात डॉक्टरांना फेविकॉल काढून टाकण्यासाठी तीन तास लागले.