'आप' नेत्या मीरा सन्याल यांचे निधन

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जानेवारी 2019

आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंडच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मीरा सन्याल (वय 57) यांचे काल निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंडच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मीरा सन्याल (वय 57) यांचे काल निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. 'एबीएम अम्रो'च्या आशिया विभागाच्या कॉर्पोरेट फायनान्स आणि सीओओ म्हणूनही त्यांनी काम केले होते.

''माझ्या सहकारी, माझ्या नेत्या, मीरा सन्याल या आता जगात नाहीत हे सांगताना मला अतिव दु:ख होत आहे. त्यांच्याहून अधिक सुंदर व्यक्ती मी पाहिलेली नाही,'' असे आपच्या कार्यकारी समितीच्या सदस्या प्रिती शर्मा मेनन यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले. 

बॅंकेतील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी 'आप'मध्ये प्रवेश केला होता. तसेच, गेल्यावेळी त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूकही लढविली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री व 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सन्याल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

Web Title: Meera Sanyal, AAP Leader Dies After Battling Cancer