Meerut Blue Drum Murder : देशभरात गाजलेल्या 'निळा ड्रम' हत्याकांडाचा निकाल; मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाला थेट फाशीची शिक्षा!

पती सौरभ राजपूतची निर्घृण हत्या करून मृतदेह ड्रममध्ये कोंबला होता; मेरठ न्यायालयाने सुनावली मरेपर्यंत फाशी
Husband Saurabh Rajput was brutally murdered and his body stuffed in a drum

Husband Saurabh Rajput was brutally murdered and his body stuffed in a drum

Sakal

Updated on: 

मेरठ/लखनौ : उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडलेल्या आणि संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित ‘ब्लू ड्रम हत्याकांड’प्रकरणी (Blue Drum Murder Case) न्यायालयाने अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. मेरठ येथील न्यायालयाने या हत्याकांडातील मुख्य आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांनाही दोषी ठरवत थेट फाशीची (Death Penalty) शिक्षा सुनावली आहे. अनैतिक प्रेमसंबंधांतून पती सौरभ राजपूत याची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह एका निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवल्याचा हा अंगावर काटा आणणारा गुन्हा सिद्ध झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com