यूपीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Blast
यूपीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू

यूपीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट (Ficracker Factory Explosion) झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक कामगारांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, मृतदेहांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्याचं प्रत्यक्षदर्शींन सांगितलं. या दुर्घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. (Meerut News Explosion In Firecracker Factory In Butrada Shamli Many Workers Died)

हेही वाचा: म्यानमार : सू की यांना आणखी चार वर्षे भोगावा लागणार तुरुंगवास

सूत्रांच्या माहितीनुसार, शामली येथील बुटराडा गावातील कारखान्यात सोमवारी हा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की त्यामुळं आजूबाजूचा परिसर हादरला. यानंतर परिसरातील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. ग्रामस्थांनी स्फोटाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा: PM मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; स्वतंत्र समितीद्वारे होणार चौकशी

पोलिसांच्या माहितीनुसार, "फटाक्यांची निर्मिती सुरु असताना कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामध्ये अनेक कामगारांचा मृत्यू झाला आहे. पण याची नेमकी संख्या अद्याप समोर आलेली नाही. हा स्फोट इतका भीषण होता की, यामध्ये कामगारांच्या मृतदेहाचे अक्षरशः चिंधड्या उडाल्या"

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uttar PradeshDesh news
loading image
go to top