Army jawan Kapil assaulted by toll staff at Meerut’s Bhuni toll plaza : ड्युटीसाठी जम्मू काश्मीर जाणाऱ्या आर्मीच्या जवानाला टोल कर्मचाऱ्याकडून मारहाण करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील भुनी टोलनाक्यावर हा प्रकार घडला. कपील असं मारहाण झालेल्या आर्मीच्या जवानाचं नाव आहे. त्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. याप्रकरणी पोसिसांनी टोल कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटकही करण्यात आली आहे.