म्हशींच्या 'फॅमिली प्लॅनिंग'साठी 24 कोटींचा रेडा; खातो काजू-बदाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

buffalo

म्हशींच्या 'फॅमिली प्लॅनिंग'साठी 24 कोटींचा रेडा; खातो काजू-बदाम

राजस्थानातील पुष्कर येथील जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्ये उंट आणि घोडे, म्हैस इत्यादी पाळीव प्राणी आहेत. मात्र यामध्ये एक रेडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. हा रेडा दिसायला आणि वजनाने मोठा आहे. त्याच्याइतकीच मोठी त्याची किंमतही आहे. भीमा असं नाव असलेल्या या रेड्याची किंमत 24 कोटी रुपये आहे. भीमा तिसऱ्यांदा या प्रदर्शनात आला आहे. त्याच्यावर 24 कोटींची बोली लागली आहे, पण त्याच्या मालकाचे म्हणणे आहे की तो त्यांच्यासाठी अनमोल आहे आणि त्यांनी भीमाला फक्त प्रदर्शनासाठी आणले आहे, विकण्यासाठी नाही.

हेही वाचा: भगवान श्री कृष्णाच्या मुर्तीचा तुटला हात; मुर्ती घेऊन पुजारी रुग्णालयात

भीमा रेड्याचे मालक जवाहरलाल जांगीड यांच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानमधील एका कुटुंबाने या रेड्याची किंमत 24 कोटी ठेवली होती पण त्यांनी भीमाला विकण्यास नकार दिला आहे. मुऱ्हा जातीचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी भीमाला ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भीमाचे स्पर्म इयर जनावरांच्या मालकांना पुरवून त्याची जात वाढवायची आहे.

भीमाने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे

जांगिड यांनी सांगितले की, तो 2018 आणि 2019 मध्ये भीमासोबत पुष्कर मेळ्यात आला होता. याशिवाय नागौर, बालोत्रा, डेहराडूनसह इतर अनेक ठिकाणी प्राण्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. भीमाची लांबी 14 फूट आणि रुंदी 6 फूट आहे. त्याच्या देखभालीवर महिन्याला दीड ते दोन लाख रुपये खर्च होतात.

हेही वाचा: हुतात्म्यांची मोदींनी माफी मागावी; केजरीवालांची मागणी

काय खातो रेडा भीमा

भीमाचा खुराक ही आश्चर्य करायला लावणारा आहे. तो सामान्य रेड्याप्रमाणे बाजरी किंवा कुट्टी खात नाही, तर त्याला 1 किलो तूप, अर्धा किलो लोणी, 200 ग्रॅम मध, 25 लिटर दूध, 1 किलो काजू-बदाम असा खुराक दररोज दिला जातो. 2 वर्षांपूर्वी भीमाचे वजन 1300 किलो होते, ते आता 1500 किलो झाले आहे. 2018 मध्ये मुऱ्हा जातीच्या या भीम रेड्याची किंमत 21 कोटी होती, ती आता 24 कोटी झाली आहे. मुऱ्हा जातीच्या रेड्याला जगभरात मोठी मागणी आहे. भीमाच्या स्पर्मपासून झालेल्या रेड्याचे वजन जन्माला येताच 40 ते 50 किलो असते. त्याच्या 0.25 मिली स्पर्मची किंमत सुमारे 500 रुपये आहे. पेनच्या रिफिलप्रमाणे 0.25 मिली स्पर्म भरले जाते. भीमाच्या मालकाचे म्हणणे आहे की तो एका वर्षात 0.25 मिलीचे 10,000 स्पर्म सॅम्पल विकतो.

loading image
go to top