भगवान श्री कृष्णाच्या मुर्तीचा तुटला हात; मुर्ती घेऊन पुजारी रुग्णालयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agra
भगवान श्री कृष्णाच्या मुर्तीचा तुटला हात; मुर्ती घेऊन पुजारी रुग्णालयात

भगवान श्री कृष्णाच्या मुर्तीचा तुटला हात; मुर्ती घेऊन पुजारी रुग्णालयात

आग्रा: शुक्रवारी शहरात एक वेगळीच घटना समोर आली. शहरातील जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांना शुक्रवारी एका पुजार्‍याने भगवान कृष्णाच्या मूर्तीच्या तुटलेल्या हाताला मलमपट्टी करण्याची विनंती केली आणि कर्मचारी गोंधळात पडले. सकाळच्या पुजे दरम्यान, देवाला स्नान घालताना मुर्तीचा हात चुकून तुटल्याने पुजाराने हा निर्णय घेतला. काही वेळानंतर अखेर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी 'श्री कृष्ण' नावाने नोंदणी केली आणि मूर्तीच्या तुटलेल्या हाताला पट्टी बांधली.

पुजारी लेख सिंह म्हणाले की, सकाळी मी मूर्तीला आंघोळ घालत असताना ती माझ्या हातातून पडली आणि हात तुटला. त्यामुळे आपल्याला धक्का बसला. देवाशी माझं नातं जवळचं असून, माझी खूप श्रद्धा असल्याने मी मूर्ती घेऊन जिल्हा रुग्णालयात पोहोचलो.

हेही वाचा: ...आणि त्याने थेट बादलीने नोटा ओतल्या, पाहून डोळे फिरतील!

दरम्यान, या पुजार्‍याचा भगवान श्रीकृष्णाच्या बालरूप मूर्तीसोबत रडतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी सकाळी ९ वाजता रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना मूर्तीच्या हाताला पट्टी बांधण्याचा आग्रह केला.

हेही वाचा: नेटकरी म्हणतात, मोदी का घमंड हारा !

loading image
go to top