esakal | बंडाच्या तयारीत असलेल्या काँग्रेसजनांना शांत करण्यासाठी लवकरच बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

Randip Surjewala

बंडाच्या तयारीत असलेल्या काँग्रेसजनांना शांत करण्यासाठी लवकरच बैठक

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : काँग्रेस अंतर्गत विद्रोही भूमिका घेणाऱ्या G-23 नेत्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी लवकरच काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक बोलावली जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याची माहिती दिली. शिमलाला जाण्यापूर्वीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याचे संकेत दिल्याचं सांगताना त्यानुसारच ही बैठक बोलावली जाणार असल्याचही त्यांनी सांगितलं.

उल्लेखनीय बाब म्हणजे, पंजाबमध्ये काँग्रेस सरकारमध्ये बदल झाल्यानंतर पक्षाचे वरीष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी प्रश्न उपस्थित करत म्हटलं होतं की, पक्षाचा अध्यक्षच नाही तर निर्णय कोण घेतंय? सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी मागणी केली होती की, सीडब्ल्यूसीची बैठक बोलावण्यात यावी कारण यावर मोकळेपणानं चर्चा होईल. यानंतर सिब्बल यांच्या घराबाहेर राहुल गांधी समर्थक नेत्यांनी आंदोलनही केलं होतं. पंजाबमध्ये नुकताच नेतृत्व बदल झाला त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी चरणजीत सिंह चन्नी यांच्याकडे देण्यात आली.

हेही वाचा: काँग्रेसमधील विसंवादावर चिदंबरम यांनी व्यक्त केली चिंता

दरम्यान, कपिल सिब्बल म्हणाले होते, आमच्या पक्षाला यावेळी कोणीही अध्यक्ष नाही. त्यामुळे आम्हाला माहिती नाही की निर्णय कोण घेत आहे. आम्हाला माहिती आहे तरी देखील आम्ही नसल्यासारखे वागतो आहोत. मला याची जाणीव आहे की, आमच्या एका वरिष्ठ सहकाऱ्यानं काँग्रेस अध्यक्षांना तत्काळ सीडब्ल्यूसीची बैठक आयोजत करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. ही बैठक व्हावी कारण आम्ही तिथं खुलेपणानं चर्चा करु शकू ज्या आम्ही सार्वजनिक स्वरुपात करु शकत नाही. काँग्रेसची सध्या ही स्थिती का झाली आहे, यावर खुलेपणानं विचार व्हायला हवा.

loading image
go to top