काँग्रेसमधील विसंवादावर चिदंबरम यांनी व्यक्त केली चिंता

कपिल सिब्बल यांना होणाऱ्या विरोधाबद्दल सुद्धा त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
P-Chidambaram
P-ChidambaramTeam eSakal

पंजाबचे माजी मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसचे अंतर्गत कलह समोर येण्यास सुरुवात झाली. पंजाबमध्ये सुरु असलेल्या सगळ्या घडामोडी आणि त्यानंतर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर आता केंद्रीय कार्यकारीणीमधील नेते देखील आता नाराज असल्याचे दिसते आहे. याच पार्श्वभुमीवर कपिल सिब्बल यांच्यानंतर आता पी. चिदंबरम हे देखील व्यक्त झाल्याचे पाहायला मिळते आहे.

काँग्रेसच्या जी-२३ गटातील नेते कपिल सिब्बल यांनी दोन दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेऊन पक्षाध्यक्ष निवडीला झालेला उशीर आणि पक्षाची सध्याची परिस्थिती अशा मुद्दयांवर चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कपिल सिब्बल यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करत त्यांच्याविरोधत रोष व्यक्त केला होता. या घडामोडी सुरू असतानाच आता पी चिदंबरम यांनी देखील पक्षाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 'जेव्हा आपण पक्षात अर्थपूर्ण संभाषण घडवून आणू शकत नाही तेव्हा मला असह्य वाटते', असे म्हणत चिदंबरम यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी सिब्बल यांना झालेल्या विरोधाबद्दल सुद्धा चिंता व्यक्त केली.

चिदंबरम यांनी यावेळी कपिल सिब्बल यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी पाहून आपल्याला असह्य झाल्यासारखे वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. एकुणच ही सर्व परिस्थिती पाहता काँग्रेसच्या जी-२३ गटातील नेते काँग्रेसच्या सद्यस्थितीबद्दल नाराज असल्याचे दिसते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com