Mega Defense Deal : भारताला मिळणार 97 फायटर जेट्स अन् 156 हेलिकॉप्टर्स; केंद्रानं दिली 'मेगा डील'ला मंजुरी

भारताची संरक्षण सज्जता वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं फायटर विमानं, हेलिकॉप्टर्स खरेदीला अंतिम मंजुरी दिली आहे.
Tejas Plane
Tejas Planesakal

नवी दिल्ली : भारताची संरक्षण सज्जता वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं फायटर विमानं, हेलिकॉप्टर्स खरेदीला अंतिम मंजुरी दिली आहे. ही प्रचंड मोठी डील असून यामध्ये ९७ तेजस फायटर जेट्स तर १५६ हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे.

डिफेन्स अॅक्वॅझिशन काऊन्सिल अर्थात संरक्षण अधिग्रहण परिषदेनं या खरेदी व्यवहाराला मंजुरी दिली आहे. फायटर जेट्स आणि हेलिकॉप्टर्स दोन्ही स्वदेशी बनावटीचे आहेत. ही मेगा डील तब्बल १.१ लाख कोटी रुपयांची आहे. (Mega Defense Deal India will get 97 fighter jets and 156 helicopters Center gave approval of rs 2 lakhs crore)

Tejas Plane
Madhya Pradesh Exit Polls : मध्य प्रदेशात काँग्रेस-भाजपत 'काँटे की टक्कर'; एक्झिट पोल काय सांगतात?

यांपैकी तेजस मार्क १ हे फायटर जेट भारतीय हवाई दलासाठी तर हेलिकॉप्टर्सची हवाई दल आणि लष्करासाठी ऑर्डर दिली आहे. परिषदेनं अतिरिक्त खरेदीला देखील मंजुरी दिली आहे. त्यामुळं ही एकूण डील सुमारे २ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. जर ही डील यशस्वी होते तर भारतानं इतिहासात स्वदेशी संरक्षण उपकरणं निर्मात्यांना दिलेली ही सर्वात मोठी ऑर्टर असेल. (Latest Marathi News)

Tejas Plane
Chhattisgarh Exit Poll: छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं उधळणार गुलाल?; स्पष्ट बहुमताचे संकेत

या डीलबाबत एकदा अंतिम किंमतीबाबत चर्चा झाल्यानंतर त्यावर सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीद्वारा हस्ताक्षर केले जातील. पण या डीलनंतर सैन्यात या विमानांचा प्रत्यक्ष समावेश व्हायला कमीत कमी १० वर्षे लागतील. सुखोई ३० एमकेआय या फायटर जेट्सच्या अपग्रेडसाठी देखील मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. (Marathi Tajya Batmya)

सध्या हवाई दलाकडं २६० हून अधिक सुखोई ३० एमकेआय फायटर जेट्स आहेत. सुखोईचं अपग्रेडेशन हे स्वदेशी असण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतानं विकसित केलेले रडार, एव्हियोनिक्स आणि सबसिस्टिम यांचा समावेश आहे.

Tejas Plane
Praful Patel: प्रफुल्ल पटेल करणार मोठे गौप्यस्फोट! लिहिणार पुस्तक; म्हणाले, माझ्याकडं...

तेजस एमके १ ए हलक्या स्वरुपातील लढाऊ विमान आहे. स्वदेशी बनावटीचं हे विमान फोर्थ जनरेशनचं लढाऊ विमान आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्कॅनिंग केलेल रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, हवेतच इंधन भरण्याची क्षमता असे महत्वाचे फिचर्स आहेत. (Latest Sport News)

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं (HAL) हे विमान बनवलं आहे. भारतानं बनवलेलं हे पहिलंच फायटर जेट आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये हे विमान पहिल्यांदा हवाई दलात रुजू झालं होतं.

यातील डबल इंजिनवाल्या फायटर जेटची मर्यादा २१००० फुटांपर्यंत उड्डाण करण्याची आहे. प्रामुख्यानं सियाचीन आणि लडाख तसेच अरुणाचल प्रदेशातील उंच भागात तैनातीसाठी हे विमान डिझाईन करण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com