बलात्कारप्रकरणी मेघालयमधील आमदाराला अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

या प्रकरणात डोरफांग न्यायालयात सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्याने 4 जानेवारीला न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांची शोधमोहिम सुरु केली होती.

शिलाँग - अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी मेघालयमधील अपक्ष आमदार ज्युलियस के. डोरफांग यांना आज (शनिवार) पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले आमदार डोरफांग हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. मेघालय आणि आसाम पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज सकाळी त्यांना गुवाहाटीतील गारचूक भागातून अटक केली. 

बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी नॅशनल लिबरेशन कौन्सिलचे प्रमुखपदही सोडले होते. या प्रकरणात डोरफांग न्यायालयात सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्याने 4 जानेवारीला न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांची शोधमोहिम सुरु केली होती. अखेर आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Meghalaya Legislator Accused Of Raping Minor Girl Arrested In Guwahati