
Mehul Choksi Latest Update : पंजाब नॅशनल बँकेला अर्थात पीएनबीला ९ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जिअममध्ये रविवारी अटक झाली आहे. यानंतर आता त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर भारतासाठी ही मोठी गोष्ट असणार आहे. त्यामुळं यासाठी आता भारत सरकारनं हालचाली सुरु केल्या असून ED-CBIचे अधिकारी बेल्जिअमला जाण्याच्या तयारीत आहेत.