तुम्हाला चौकशी करायची म्हणून मी प्रवास करणार नाही; मेहूल चोक्सीचा कांगावा

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अर्जाला विरोध करतानाच पंजाब नॅशनल बँकेला थकबाकी फेडण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता, असा दावा मेहुल चोक्सीने न्यायालयात केला आहे. तुम्हाला चौकशी करायची म्हणून मी 41 तासांचा विमान प्रवास करुन भारतात परतणे अशक्य असल्याचेही त्याने न्यायालयात सांगितले.

नवी दिल्ली- अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अर्जाला विरोध करतानाच पंजाब नॅशनल बँकेला थकबाकी फेडण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता, असा दावा मेहुल चोक्सीने न्यायालयात केला आहे. तुम्हाला चौकशी करायची म्हणून मी 41 तासांचा विमान प्रवास करुन भारतात परतणे अशक्य असल्याचेही त्याने न्यायालयात सांगितले.

न्या. एम एस आझमी यांच्यासमोर सोमवारी मेहुल चोक्सीच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य देखील कमी दाखवले आहे, असे चोक्सीचे म्हणणे असल्याचे वकिलांनी सांगितले. माझी प्रकृती सध्या चांगली नसून मी विमानाने 41 तासांचा प्रवास करुन भारतात परतू शकत नाही, असे चोक्सीने स्पष्टीकरण दिल्याचे म्हटले आहे. ईडीचा तपास कासवगतीने सुरु असून हा वेग पाहता खटला सुरु होण्यासाठी अनेक वर्ष जातील, असेही यावेळी चोक्सीच्या वकिलांनी सांगितले आहे.

दरम्यान, ईडीने 11 जून रोजी मुंबईतील पीएमएलए कोर्टात फरारी आर्थिक गुन्हेगार अध्यादेशानुसार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांविरोधात दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले होते. या अर्जावरील सुनावणीत दरम्यान मेहुल चोक्सीने वकिलांमार्फत 34 पानी उत्तर दिले आहे.

Web Title: Mehul Choksi To Pmla Court Cannot Endure 41 Hr Flight To India