esakal | मिसेस ट्रम्प जाणार दिल्लीतील शाळेत; मुख्यमंत्री करणार स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

Melania Trump to visit Delhi government school
  • अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जाणार दिल्लीतील शाळेत
  • अरविंद केजरीवाल करणार मेलानिया ट्रम्प यांचे स्वागत

मिसेस ट्रम्प जाणार दिल्लीतील शाळेत; मुख्यमंत्री करणार स्वागत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प या त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान राजधानी दिल्लीतील शाळांना भेट देत तेथील ‘हॅप्पीनेस क्लास’ची माहिती घेणार आहेत. दक्षिण दिल्लीतील शाळेला मेलानिया भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीदरम्यान त्या साधारणपणे तासभर शाळकरी मुलांबरोबर असतील. दिल्लीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मेलानिया यांचे खास स्वागत करतील. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे हॅप्पीनेस क्लासचे जनक मानले जातात. मुलांवरील शालेय अभ्यासाचा ताण कमी व्हावा, या उद्देशानेच या क्लासची सुरुवात करण्यात आली असून त्यामध्ये योगासने आणि मैदानी खेळांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रोडशोसाठी केवळ एक लाख माणसे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान गुजरातमध्ये होणाऱ्या रोड शोवरून समाज माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे. खुद्द ट्रम्प यांनीच या रोडशोमध्ये सत्तर लाख लोक सहभागी होणार असल्याचा दावा केल्यानंतर तो आता अहमदाबाद महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. या रोडशोमध्ये केवळ एक लाख लोक सहभागी होतील, असे महापालिका आयुक्त विजय नेहरा यांनी ट्विटच्या माध्यमातून जाहीर केले.

फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषीची नवी चाल

ताजमहाल परिसरात साफसफाई
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया यांच्यासोबत आग्रा येथील ताजमहाल परिसराला भेट देणार असल्याने सध्या या भागात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. ताजहाल परिसरामध्येही कारंज्याच्या दुरुस्तीची कामे केली जात असून, यमुना नदीपात्रामध्ये नव्याने पाणी सोडण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षा पथकातील अधिकाऱ्यांनी याआधीच ताजमहाल परिसराची पाहणी केली असून, या वेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. यमुना नदीतील प्रदूषण कमी व्हावे, तसेच लोकांना पाण्याची दुर्गंधी येऊ नये, म्हणून पात्रामध्ये अतिरिक्त विसर्ग करण्यात आला आहे.

loading image