
Menstrual Leave : कोण कोणते देश देतात महिलांना मासिक पाळीची रजा; जाणून घ्या!
भारतातील विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांना मासिक पाळीच्या सुट्टीची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) भारताच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती आज न्यायालयाने फेटाळली आहे.
मात्र, आता ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारण्यास कोर्टाने नकार दिला आहे. अधिवक्ता शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. ही धोरणात्मक बाब असून, याचिकाकर्त्याला सरकारकडे जाऊन त्यांच्या मागणीसह निवेदन द्यावे लागेल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर जगभरात असे कोणते देश आहेत जे मासिक पाळीच्या काळात महिलांना रजा देतात. याची सुरूवात नक्की कशी झाली. ते जाणून घेऊयात.
स्त्रीला ठराविक वयात दर महिन्याला मासिक पाळी म्हणजेच पिरियड्स येतात. साधारण दर 28 दिवसांच्या कालावधीनंतर चार दिवसांचा हा काळ असतो. त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली आणि मूडवर परिणाम होतो. परिणामी पिरियड्स सुरू असताना त्या स्त्रीला आरामाची नितांत गरज असते. पण, तिला तारेवरची कसरत करावी लागते.
प्रत्येक महिन्याचे ते चार दिवस सवयीचे झाले असले तरीही त्या दिवसात तिला आरामाची गरज असते. हीच गरज ओळखून महिलांना पाळीच्या दिवसात रजा देणारा स्पेन हा पहिला देश ठरला होता. मासिक पाळीच्या रजेची सुरूवात स्पेनमधूनच झाली होती.
या देशात मिळते रजा
- इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानसह काही आग्नेय आशियाई देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीत रजा घेण्याची परवानगी आहे.
- इंडोनेशियामध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात दोन दिवस रजा घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, ही रजा अतिरिक्त रजेमध्ये मोडत नाही.
- जपानमध्ये मासिक पाळीच्या रजेचा कायदा 70 वर्षांहून अधिक काळापासून लागू करण्यात आलेला आहे. 1947 मध्ये मंजूर झालेल्या कामगार मानक कायद्याच्या कलम 68 मध्ये असं म्हटलं आहे की, "ज्या महिलेला मासिक पाळीच्या काळात काम करणं कठीण आहे, अशा महिलेनं रजेची विनंती केली असता, नियोक्ता तिला काम करण्याची सक्ती करू शकत नाही.