
Mentally Ill Man Beheads 5-Year-Old in Front of Mother
Esakal
पाच वर्षांच्या चिमुकल्याची त्याच्या आईच्या डोळ्यासमोरच हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. मनोरुग्णाने घरात घुसून चिमुकल्याचा शीर धडापासून वेगळं केलं. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. आईच्या डोळ्यादेखत तिच्या पोटच्या लेकराची निर्घृण हत्येची घटना हादरवणारी आहे. मध्य प्रदेशातील धार इथं ही घटना घडलीय. चिमुकल्याच्या कुटुंबासोबत कसला वाद नाही, ओळखही नसलेल्या आरोपीनं एक वार करताच शीर धडापासून वेगळं झालं होतं.