वयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकार

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

देवराजन हे गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी शोरुमला गेले असता, त्यांनी या त्यांच्या स्वप्नाबाबत माहिती दिली. शोरुमनेही त्यांना योग्य ते आदरातिथ्य देत गाडीची चावी त्यांच्या हातात दिली. चेन्नईतील ट्रान्स कार या शोरुममधून त्यांनी ही गाडी घेतली आहे. 

चेन्नई - शेतकऱ्याचे बैलगाडी हेच खरे प्रवासाचे साधन असते. परंतु, चेन्नईतील देवराजन नावाच्या एका शेतकऱ्याने वयाच्या 8 व्या वर्षी मर्सडीज गाडी घेण्याचे स्वप्न बघितले आणि ते तब्बल 80 वर्षानी सत्यात उतरले आहे. वयाच्या 8 व्या वर्षी जेव्हा देवराजन यांनी हे स्वप्न पाहिले त्यावेळी, त्यांना ही गाडी कोणत्या कंपनीची आहे हेदेखील माहित नव्हते. परंतु, त्यांना या गाडीबद्दल माहिती मिळाल्यावर एक दिवस आपण ही गाडी विकत घ्यायची असे स्वप्न पाहिले.

देवराजन हे गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी शोरुमला गेले असता, त्यांनी या त्यांच्या स्वप्नाबाबत माहिती दिली. शोरुमनेही त्यांना योग्य ते आदरातिथ्य देत गाडीची चावी त्यांच्या हातात दिली. चेन्नईतील ट्रान्स कार या शोरुममधून त्यांनी ही गाडी घेतली आहे. 

लहानपणी बैलगाडीतून प्रवास करताना मर्सडीज मोटारचे पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले असून, या प्रवासात आपल्याला आपल्या पत्नीची मोलाची साथ लाभली असल्याचे देवराजन यांनी यावेळी सांगितले. एकप्रकारे बैलगाडी ते मर्सडीज कार असा प्रवासच देवराजन यांनी केला आहे.

Web Title: Mercedes at age 88; The dream of the farmer is true