Government Action on Meta: ‘मेटा’च्या ‘अल्गोरिदम’वर सरकारी कंट्रोल? डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राने दिले मोठे निर्देश

Government Seeks Changes in Meta’s Algorithms: मेटाच्या अल्गोरिदमवर केंद्र सरकारने निर्देश दिले असून डीपफेक, दिशाभूल करणारा कंटेंट आणि बेकायदा आशय रोखण्यासाठी कृती आराखडा मागवला आहे.
Government Action on Meta

Government Action on Meta

esakal

Updated on

नवी दिल्ली: डीपफेक, प्रचारकी मजकूर आणि अन्य फेरफार केलेला अथवा बेकायदा कंटेंट रोखण्यासाठी ‘मेटा’ने अल्गोरिदममध्ये बदल करावेत आणि त्यासाठीच्या उपाययोजनांचा कृती आराखडा सादर करावा, अशा सूचना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने दिल्या आहेत. सरकारकडून ‘मेटा’च्या प्लॅटफॉर्मवरील डीपफेक, बाललैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंट आणि अन्य हानिकारक आशयाबाबत चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतर, काही दिवसांत ‘मेटा’च्या कामकाजाची छाननी अधिक तीव्र करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com