#MeToo ''विसरून जा मी संघ प्रचारक, ही तर शारीरिक गरज''

वृत्तसंस्था
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : ''मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) प्रचारक आहे, हे विसरुन जा. ही एक शारीरिक गरज आहे'', अशा शब्दांत #MeToo प्रकरणी आरोप झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने पीडित तरुणीला सांगितले होते. याबाबतचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. 

याबाबत पीडित तरुणीने सांगितले, की ''मी आपल्या भावांसोबत संघाच्या शाखेत या गोष्टींसाठी गेले नव्हते. आरएसएस माझ्या कुटुंबियाचा एक भाग आहे. आमच्या घरातील मुलांनी संघासाठी बलिदान दिले. #MeToo प्रकरणावर केलेल्या खुलाशानंतर याप्रकरणातील संबंधित पदाधिकाऱ्याला भाजपने पदावरून हटविले आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीने भाजप पदाधिकाऱ्यावर आरोप केले आहेत. यामध्ये तिने सांगितले, की मी आरएसएसचा प्रचारक आहे, हे विसरून जा. ही एक शारीरिक गरज आहे.   

दरम्यान, ज्या महिलांचे लैंगिक शोषण झाले अशा महिला #MeToo मोहिमेंतर्गत समोर येत आहेत. या मोहिमेंतर्गत राजकीय, बॉलिवूडसह अन्य काही क्षेत्रातील महिलांवर झालेल्या लैंगिक शोषणाविषयी उघडपणे बोलत होते. 

Web Title: MeToo Case forget I am a campaigner this is the physical need says BJP Worker