#MeToo विनता नंदा यांची पोलिसांकडे तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

मुंबई : लेखिका विनता नंदा यांनी बुधवारी (ता. 17) बाबूजी अर्थात आलोकनाथ यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यामुळे आलोकनाथ यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. 

मुंबई : लेखिका विनता नंदा यांनी बुधवारी (ता. 17) बाबूजी अर्थात आलोकनाथ यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यामुळे आलोकनाथ यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. 

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्या विरोधात केलेल्या आरोपांनंतर बॉलिवूडसह कॉर्पोरेट जगतातही "मी टू' मोहिमेमुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी लेखिका विनता यांनी फेसबुकवर पोस्ट अपलोड केली होती. त्यांनी आलोकनाथ यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप केला होता. नंदा यांच्यानंतर आलोकनाथ यांच्या विरोधात अभिनेत्री नवनीत निशान, संध्या मुदुल यांनीही आरोप केले. या वादात अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही उडी घेतली. मद्याच्या अधीन गेल्यावर आलोकनाथ यांचे वेगळे रूप समोर येते, अशी खोचक टीका त्यांनी केली होती.

दरम्यान, आलोकनाथ यांनी गैरवर्तनाचे आरोप फेटाळून लावले. तसेच त्यांनी नंदा यांच्या विरोधात अंधेरीतील न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला. या घडामोडीनंतर बुधवारी नंदा यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार लेखी तक्रार दिली. ओशिवरा पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला. 

Web Title: MeToo Complaint to Vinita Nanda in Police Stations