मेट्रो मॅन भाजपमध्येच का जाणार? वाचा काय म्हणाले ई श्रीधरन

टीम ई सकाळ
Saturday, 20 February 2021

केरळमध्ये निवडणुकीआधी भाजपने हालचाली सुरु केल्या असून मेट्रो मॅन ई श्रीधरन हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

तिरुवनंतरपुरम - देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापैकीच एक असलेल्या केरळमध्ये निवडणुकीआधी भाजपने हालचाली सुरु केल्या असून मेट्रो मॅन ई श्रीधरन हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षात प्रवेश करण्यासाठी आपल्याला भाजपच्या मुल्यांमुळे प्रेरणा मिळाली असं ई श्रीधरन यांनी म्हटलं आहे.

ई श्रीधरन यांनी लव्ह जिहादवबाबतही वक्तव्य केलं असून ते म्हणाले की, भाजप हा सांप्रदायिक पक्ष नसून देशावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष आहे. केरळमध्ये हिंदू आणि ख्रिस्ती मुलींना भुरळ घालण्याचे प्रयत्न होत असून त्यालाच लव्ह जिहाद असं म्हणते. 

हे वाचा - देशाचा 'मूड' समजलाय, आता वेगानं पुढे जायचंय - पंतप्रधान मोदी |

एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी म्हटलं की, मी माझ्या जबाबदारीत बिझी होतो. आता मला केरळसाठी कायतरी करायचं आहे. यासाठीच राजकारणात यायचा निर्णय घेतला. गेल्या 15-20 वर्षांत युडीएफ, एलडीएफचं सरकार होतं, मात्र त्यांनी फार काही केलं नाही. दोन दशकात राज्यात एकही उद्योग येऊ शकला नाही. भ्रष्टाचारात प्रचंड वाढ झाली असल्याचंही ई श्रीधरन यांनी म्हटलं. 

आपण लव्ह जिहादच्या विरोधात असल्याचं सांगताना ई श्रीधरन म्हणाले की, राज्यात हिंदू मुलींना फसवलं जात आहे. मी पाहिलं आहे की केरळमध्ये काय काय झालं. कशा पद्धतीने लग्नाचं आमिष दाखवून फसवलं जातं आणि कसं त्या मुली हे सगळं सहन करतात. फक्त हिंदू, मुस्लिमचं नाही तर ख्रिश्चन मुलींनासुद्धा फसवण्यात येतं असा दावाही ई श्रीधरन यांनी केला. 

इंधन दरवाढीवर अमूलचं कार्टूनद्वारे मार्मिक भाष्य; नेटिझन्सनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

भाजप प्रवेश करण्याचा निर्णय आपण घेतला असून फक्त औपचारिकता बाकी राहिली असल्याचंही ई श्रीधरन यांनी सांगितलं. निवृत्तीनंतर मी गेल्या 10 वर्षांपासून केरळमध्ये राहत आहे. मी अनेक सरकारं पाहिली आणि लोकांसाठी जे करायला हवं ते केलं जात नसल्याचं दिसलं. माझ्या अनुभवाचा वापर करून भूमिका बजावण्यासाठी मी भाजपमध्ये जात आहे असं ई श्रीधरन म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: metro man e shreedharan talks over love jihad in kerala and bjp