स्पेन-मोरक्कोची सीमा दाखवली, भारत-पाकची !

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

या अहवालामध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या सीमारेषेवर सरकारकडून "फ्लडलाईट्‌स' लावण्यात आल्यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. या लाईट्‌समुळे भारतामध्ये घुसणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्याकरिता मोठी मदत झाली आहे. मात्र ही माहिती देताना स्पेन व मोरोक्कोमधील सीमारेषेचे छायाचित्र वापरण्यात आले आहे!

नवी दिल्ली - भारत व पाकिस्तान या देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेच्या नावाखाली केंद्रीय गृहमंत्रालयाने चक्क स्पेन व मोरोक्को या दोन देशांमधील सीमारेषेचे छायाचित्र प्रसिद्ध केल्याचे आढळून आले आहे!

केंद्र सरकारची अंतर्गत सुरक्षा व जम्मु काश्‍मीर, नक्षलवादग्रस्त भाग तसेच ईशान्य भारतासंदर्भातील कामगिरी अधोरेखित करणाऱ्या या वार्षिक अहवालामध्ये हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. आफ्रिका खंडाच्या उत्तर टोकावर, जिब्राल्टरच्या आखातास लागून असलेले क्‍युटा हे स्पॅनिश स्वायत्त शहर व मोरोक्को देशामधील सीमारेषेचे हे छायाचित्र असून ते इंटरनेटवर उपलब्ध आहे.

या 342 पानी अहवालामध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या सीमारेषेवर सरकारकडून "फ्लडलाईट्‌स' लावण्यात आल्यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. या लाईट्‌समुळे भारतामध्ये घुसणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्याकरिता मोठी मदत झाली आहे. मात्र ही माहिती देताना स्पेन व मोरोक्कोमधील सीमारेषेचे छायाचित्र वापरण्यात आले आहे!

दरम्यान, सदर छायाचित्र चुकीचे वापरण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले असले; तरी अद्यापी या प्रकरणी गृहमंत्रालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

Web Title: MHA uses photo of Spain-Morocco border in report on floodlighting at India-Pakistan border