Omicron वर बायोएनटेक आणणार प्रभावी लस! दिलासादायक बातमी

omicron
omicronesakal

कोवीडचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनची (omicron) सध्या जगभरात दहशत निर्माण झाली आहे. पण याच (omicron) ऑमीक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी लस शोधण्याचं काम बायोएनटेक (Bioentech) कंपनीनं सुरु केलं आहे. व्हेरिएंटचा धोका वाढल्यास पुढील 100 दिवसांत लस बाजारात आणण्याची तयारी बायोएनटेकनं दर्शवली आहे

100 दिवसांच्या आत नवी लस

ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढलाच तर जास्तीत जास्त 100 दिवसांच्या आत यावरची नवी लस बाजारात आणण्याची तयारी असल्याचं बायोएनटेकच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. बायोएनटेकची सध्याची लस ओमिक्रॉनवर किती प्रभावी ठरते हे निरीक्षणानंतर येत्या दोन आठवड्यात कळेल आणि त्या निष्कर्षावर आधारीत आवश्यक बदल लसीमध्ये केले जातील. बायोएनटेक ही अमेरिकेत फायझर (Pfizer) सोबत मिळून कोवीड लस विकसित करणारी कंपनी आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग पसरत असल्याचं लक्षात येताच कंपनीनं त्यावर काम करणं सुरु केलं असल्याचं बायोएनटेककडून सांगण्यात येतंय.

omicron
Omicron: आफ्रिकेतून आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह; चिंता वाढली

लसीमध्ये आवश्यक ते बदल करणार

फायझर आणि बायोएनटेक कंपनीनं म्हटलं की, ''आम्हांला आशा आहे की, आम्ही ओमिक्रॉन व्हेरिएंटवर 100 दिवसांत प्रभावी लस संशोधन आणि उत्पादन करण्यात सक्षम आहोत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटपासून खूप वेगळा आहे.'' कंपनीनं महिनाभर आधीच ओमिक्रॉन व्हेरिएंटवर लस बनवण्याची तयारी सुरु केल्याचं सांगितलं आहे. ओमिक्रॉन (B.1.1.529) जगभरात पसरण्याची शक्यता गृहीत धरुन लसीमध्ये आवश्यक ते बदल करत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

omicron
'अंतिम' वर्षातील परीक्षा ऑफलाइन! द्वितीय, प्रथम वर्षाला ऑनलाइन संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com