ही गर्दी बघा; कसं रोखणार कोरोनाला? भारतापुढचं आव्हान वेगळचं!

New-Delhi-Anand-Vihar-Bus-Station
New-Delhi-Anand-Vihar-Bus-Station

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला. याबरोबरच लोकांना घरी राहण्याचे आवाहनही केले. मात्र, गरीब आणि कामगार वर्गासमोरच्या अडचणींमध्ये यामुळे वाढ झाल्याचे दिसून आले.

शहरात खाण्या-पिण्याचे हाल होऊ लागल्यानंतर अनेकांनी गावाचा रस्ता धरला. राजधानी दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमधील कामगार वर्ग आणि नोकरीसाठी शहरात आलेले लोक गावाकडे परतू लागले आहेत. मात्र, रेल्वे आणि बसगाड्या बंद असल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिल्लीमधील आनंद विहार बसस्थानकावर शनिवारी (ता.२८) जवळपास १० हजारपेक्षा जास्त लोक घरी जाण्यासाठी जमा झाले होते. दुसरीकडे धौलाकुआँ येथील स्थितीही काही वेगळी नव्हती. या ठिकाणीही हजारोंच्या संख्येत लोक आले होते.

हजारोंच्या संख्येने जमले लोक 

दिल्लीत हातवर पोट असणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या समस्या जाणवू लागल्यानंतर सगळे कामगार गावाकडे जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. लॉकडाऊन असतानाही मोठ्या संख्येत लोक जमा झाल्याने प्रशासनासमोरच्या अडचणींमध्ये भर पडली. मजूर, कामगार आणि गरिबांसाठी राज्य आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. कुणावरही उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, यानंतरही राजधानी दिल्लीतील कामगार वर्ग दिल्लीत थांबण्यासाठी तयार नाही. सगळ्यांना आपल्या गावी जाण्याची घाई झाली आहे. त्यामुळे शनिवारी (ता.२८) मोठ्या संख्येत लोक बाहेर पडले होते. आनंद विहार बसस्थानकावर हजारोंच्या संख्येत लोक जमा झाल्याने तेथे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

शहरात खाण्या-पिण्याची आबळ होत असल्याने लोक गावी जाण्याच्या मतावर ठाम आहेत. गावाकडे निदान खाण्या-पिण्याचे तरी हाल होणार नाहीत, असे या सगळ्यांचे म्हणणे आहे. वाहतूक व्यवस्था पूर्ववत केल्याने आता काय करायचं या द्विधा मनस्थितीत काहीजण अडकले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने बस सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शनिवारी हजारोंच्या संख्येत लोक आनंद विहार बसस्थानकावर आले होते. 

कोरोनाची भीती नाही, सोशल डिस्टन्सचा पडला विसर

घरी जाणं हे मनाशी पक्क केलेल्या या सर्व कामगारांना कोरोनाची भीती वाटत नसल्याचे दिसून आले. तसेच त्याचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या गोष्टीचाही त्यांना विसर पडला होता. अनेक कामगारांनी पायी चालत गावचा रस्ता धरल्याने रस्त्यांवर टोळक्यांची संख्या वाढू लागली. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना घरी पोहोचवण्यासाठी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश-दिल्लीच्या सीमेवरील भागात २०० बसेसची व्यवस्था करण्यात आली. या बसेस गाझियाबाद आणि नोएडा या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या. सर्वात जास्त लोक दिल्लीमधून बाहेर पडत आहेत. 

शेवटी त्यांनी पायीच जायचं ठरवलं

गेल्या दोन दिवसांत घरी जाण्यासाठी हजारोंच्या संख्येत लोक वाहनांच्या शोधात बाहेर पडत होते. राजधानी दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातून टोळके रस्त्यावरून चालत निघाल्याचे दिसताच सरकारने त्यांना गावी पोहोचवण्यासाठी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी गाजीपूर बॉर्डर आणि धौलाकुआँ या भागात हजारोंच्या संख्येत लोक जमा झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com