शोपियाँत दहशतवाद्यांनी पोलिसांच्या 5 रायफल्स पळविल्या

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी, लष्करी आणि निमलष्करी दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात न्यायालयाबाहेर गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पाच रायफल्स दहशतवाद्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ही घटना घडली असून, दहशतवाद्यांनी पोलिसांच्या चौकीवर हल्ला करत पाच एसएलआर रायफल्स चोरल्या. जिल्ह्या न्यायालयाच्या आवारात पोलिसांची चौकी होती. दहशतवाद्यांनी भिंत पार करून पोलिसांच्या खोलीत प्रवेश करत दोन पोलिसांना मारहाण करत त्यांच्याजवळील रायफल्स पळविल्या.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी, लष्करी आणि निमलष्करी दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. यावेळी कामावर गैरहजर असलेल्या पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बँक लुटण्याच्या घटनेनंतर ही मोठी घटना घडली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून काश्मीर खोऱ्यात पोलिसांच्या बंदुका पळवून नेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अधिकृत माहितीनुसार, 62 रायफल्स, सहा पिस्तुल आणि 182 मॅगझीन्स दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांकडून चोरुन नेल्या आहेत.

Web Title: Militants snatch five-SLR rifles from cops in Shopian