

Mini Goa
sakal
उत्तर प्रदेश म्हटलं की डोळ्यांसमोर फक्त काशी किंवा अयोध्येची मंदिरे येतात, पण यूपीमध्ये निसर्गप्रेमींसाठी एक असं ठिकाण आहे ज्याला 'मिनी गोवा' म्हणून ओळखलं जातं. उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा विकेंडला फिरण्यासाठी हे ठिकाण सध्या पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. जर तुम्हाला गोव्यासारखा समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य वातावरण अनुभवायचे असेल, तर पीलीभीत जिल्ह्यातील 'चुका बीच' (नाथनगर) हे तुमच्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे.