केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान 9000 रुपये निवृत्तिवेतन

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन किमान नऊ हजार रुपये होणार असून, हंगामी मुदतीतही दुप्पट वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी ही माहिती दिली.

स्वयंसेवी संस्थांच्या स्थायी समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. हंगामी मदतीत 10-15 लाख रुपयांवरून 25-35 लाख रुपये वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. निवृत्तिवेतनातील वाढीचा फायदा केंद्राच्या सुमारे 50-55 लाख कर्मचाऱ्यांना होईल.

Web Title: minimum pension of 9000 to central govt employees