अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

यूएनआय
शुक्रवार, 4 मे 2018

हारदी भागात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात एका महिलेचाही समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.

बहराइच - येथील हारदी भागात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात एका महिलेचाही समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.

छुतान, मिथुन, हनुमान प्रसाद, निर्मलादेवी आणि अन्य एकाविरुद्ध पीडित मुलीच्या पालकांनी याप्रकरणी तक्रार  दिली आहे. पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या एक महिन्यापासून हे सर्वजण पीडित मुलीवर बलात्कार करीत होते आणि निर्मलादेवी त्यांना मदत करीत होती. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. 

Web Title: minior gang-raped in bahraich